
सोनपेठ तालुक्यातील निमगाव येथील वान नदीपात्रात तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवार, 16 ऑक्टोबर घडली. शुभम सुरेश मुळे (वय – 6) शिवकन्या सुरेश मुळे (वय – 14) हे दोघे बहीण- भावांचे व मामा सचिन संभाजी बोडके (वय – 20, रा. सर्व दहीखेड) अशी मृतांची नावे आहेत.
तालुक्यातील निमगाव येथे दसर्यानिमित्त धुणे धुण्यासाठी वान नदीवर शुभम व शिवकन्या आई आणि मामासोबत गेले होते. पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे बहीण-भाऊ वाहून जाऊ लागले. मामाने त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली, मात्र वेगवान प्रवाहात तिघेही वाहून गेले आणि तिघांचाही बुडून मृत्यू झाला.
दरम्यान, भोई समाजाच्या युवकांच्या मदतीने तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी भेट दिली. या घटनेमुळे निमगाव गावात व परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.


























































