सोनी मराठीच्या सेलिब्रिटी मॉम्सचा ग्लॅमरस मदर्स डे

117

सामना ऑनलाईन । मुंबई

आंतरराष्ट्रीय मातृदिन किंवा मदर्स डे म्हणजे आई आणि मुलांमधल्या प्रेमाचा उत्सव! आई आणि मुलांमधले मायेचे नाते निरंतर असले तरीही आपल्या मायेच्या भावना व्यक्त करण्याचा ‘हा दिवस तसा स्पेशलच. तरुणाई या निमित्ताने आईशी कनेक्ट होत हा सण साजरा करत असताना सेलिब्रिटीही यामध्ये मागे कसे असणार!

मराठी मनोरंजन जगतामध्ये सोनी मराठी चॅनल करमणुकी सोबतच इतरही नवनवे उपक्रम घेऊन असते. अर्थातच सोनी मराठीच्या ‘सेलिब्रिटी मॉम्स’नी अगदी हटके स्टाईल मदर्स डे साजरा केला आहे. मदर्स डे निमित्त सोनी मराठीने ऋचा बर्वे, सीमा घोगले, गौतमी देशपांडे, मुग्धा गोडबोले, शीतल क्षीरसागर, आदिती शारंगधर, उज्वला जोग, पूर्णिमा अहिरे, विमल म्हात्रे, प्रज्ञा जावळे, राणी गुणाजी, रसिका धामणकर आणि मयुरी वाघ या सर्व आया आणि लेकींनी मुंबईतील ‘एनरिच अकॅडमी’ या स्पामध्ये ट्रिटमेंटचे खास गिफ्ट दिले.

या निमित्ताने सोनी मराठीच्या वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री तर एकत्र आल्याच, पण त्यांच्याबरोबर त्यांच्या लेकिंचाही सहभाग पहिल्यांदाच झाला. शरीर प्रसन्न असेल तर मन प्रसन्न राहते. आणि शिवाय ह्या दिवशी आईची ‘स्पेशल’ बडदास्त आणि लाड करायचे असल्यामुळे आया आणि लेकी दोघींनीही सौंदर्याची सुखावह निगा आणि काळजी घेणाऱ्या खास *ट्रिटमेंट्स घेऊन रिलॅक्स केले. कुणी नवा हेअरकट केला, तर कोणी हेअरवॉश केले, तर कुणी नखांवर सुंदरशी नेल आर्ट काढली. लेकिंनीही आपल्या मम्मासारखे ग्लॅमरस होऊन मिरवले. आपल्या लेकीबरोबर चांगला वेळ घालवण्याची आणि एक मैत्रीण म्हणून कनेक्ट होण्याची ही संधी आयांनी पुरेपूर वापरली. कलाविश्वातील या सर्व सखींचा आणि त्यांच्या लेकींचा हा आगळावेगळा सुंदर मिलाफ घडवून आणल्याबद्दल सेलिब्रिटी मॉम्सनी सोनी मराठीचे विशेष आभार मानले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या