अंशुमन विचारेची नवी इनिंग!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता अंशुमन विचारेला आजवर सगळ्यांनी विनोदी भूमिका साकारताना पाहिले आहे. मात्र आता तो गाण्याद्वारे नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. ‘सोनी मराठी’ वाहिनीवर 21 ऑगस्टपासून सुरू होणाऱया ‘सिंगिंग स्टार’ या कार्यक्रमात अभिनेता आणि गायक अशा जोडय़ा स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत. याच जोडय़ांमध्ये एक जोडी आहे अंशुमन विचारे आणि जुईली जोगळेकर. अंशुमनला गाणं हे प्रचंड आवडतं. तो गाणं शिकलेला नाही; पण जे काही गाणं तो गाऊ शकतो ती त्याला दैवी देणगी आहे असं तो मानतो. सिंगिंग स्टार या कार्यक्रमामुळे त्याला गाणं शिकण्याची संधी मिळणार असल्याचंही तो म्हणतो. या संगीतमय प्रवासात अंशुमनला साथ देणारी गायिका जुईली जोगळेकर हिचे सोशल मीडियावर खूप फॉलोवर्स असून तिचे यू-टय़ूब चॅनेलदेखील आहे.