
दाक्षिणात्य अभिनेत्री विजयलक्ष्मीने मानसिक तणावाखाली आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सुदैवाने डॉक्टरांना तिला वाचवण्यात यश आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. आपल्यावर काही राजकीय नेत्यांचा दबाव होता, म्हणून आपण हे कृत्य केल्याचे तिने काही व्हिडीओमध्ये म्हटले होते.
विजयलक्ष्मीने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले होते की हा माझा अखेरचा व्हिडीओ आहे. गेली चार वर्षे आणि चार महिने मी सीमान आणि त्याच्या पक्षाच्या लोकांमुळे तणावात आहेत. आपल्या कुटुंबीयांसाठी जगण्याचा मी खूप प्रयत्न केला पण मला ते आता शक्य होत नाही. हरी नादरने माझा खूप अपमान केला आहे. मी ब्लडप्रेशरच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करत आहेत. काही वेळात माझे ब्लडप्रेशर कमी होऊन माझा मृत्यू होईल असे विजयलक्ष्मीने म्हटले होते.
विजयलक्ष्मीने आपल्या फॅन्सना आवाहन केले होते की सीमान आणि हरि नादर सारख्या लोकांना कधीच माफ करू नका. मला छळल्याबद्दल त्यांना कडक शिक्षा करा असे तिने म्हटले होते. मिळालेल्या माहितीनुसार विजयलक्ष्मी सध्या चेन्नईच्या एका रुग्णालयात दाखल असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. सीमान एका एका पक्षाचे अध्यक्ष असून हरि नादरही राजकीय नेते आहेत. त्यांनी आपला मानसिक छळ केल्याचा आरोप विजयलक्ष्मीने केला आहे.



























































