‘रेल्वेत’ नोकरीची मोठी संधी; 4,000 जागांसाठी मेगाभरती; असा करा अर्ज

तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. दक्षिण मध्य रेल्वेने ‘अप्रेंटिस’ पदासाठी मेगाभरती काढली आहे. आपण ही या नोकरीसाठी अर्ज करण्यास इच्छूक असाल तर, आधी खाली दिलेली बातमी वाचा.

दक्षिण मध्य रेल्वेने या पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्या संकेतस्थाळावर जाहीर केली आहे. दक्षिण मध्य रेल्वेने 4103 रिक्त पदांसाठी भरती काढली आहे. ज्यात जनरल उमेदवारणसाठी 1689, एससी – 607, एसटी – 302 आणि ओबीसी 1101 पदे राखीव आहेत. अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 9 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 डिसेंबर आहे.

अप्रेंटिस पदाच्या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी पर्यंत शिक्षण आणि ITI (Industrial Training Institutes) अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अधिसूचना पहा.

अर्ज कसा करावा

ज्या उमेदवारांना या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे ते scr.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या जनरल, ओबीसी आणि इडब्लूएस उमेदवारांना 100 रुपये परीक्षा फी भरावी लागणार आहे. तर SC/ST/महिला/PWD उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. परीक्षा शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगद्वारे दिले जाऊ शकते. उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल.

अधिसूचना पाहण्यासाठी येथे करा ‘क्लिक

आपली प्रतिक्रिया द्या