दक्षिण गोव्यात पावसाच्या हलक्या सरी बरसणार

384

उकाड्याने जीव हैराण झालेला असताना पणजी वेधशाळेने दुपारी पावणे एक वाजता बुलेटिन जारी करून दक्षिण गोव्यातील केपे आणि काणकोण तालुक्यात पुढील तीन तासांत एखाद दुसऱ्या ठिकाणी गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार पाऊस पडला असल्याने उकाड्याने हैराण लोकांना दिलासा मिळाला आहे.

केपे तालुक्यातील आंबावलीसह काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याचे वृत्त आहे. केपे आणि काणकोण तालुक्यावर पावसाचे ढग जमले आहेत. हा पाऊस आंबा आणि काजू यांना मात्र मारक ठरण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या