Cooking Tips – साऊथ इंडियन पदार्थ बनवताना ‘या’ चुका टाळा

साऊथ इंडिया नैसर्गिक सौंदर्यासोबतच तेथील अन्नासाठी देखील ओळखला जातो. येथील बहुतेक पदार्थ बनवण्यासाठी मसूर, तांदूळ, नारळ आणि काही मसाले वापरले जातात. सांबार, इडली, डोसा, उत्तपम, नारळ आणि अनेक प्रकारच्या चटण्या असतात ज्या चवीला अप्रतिम असतात. केवळ साऊथमध्येच नाही तर देशभरातील लोकांनाही हे पदार्थ खायला आवडतात.

तामिळनाडूमध्ये पनियारम आणि अदाई, कर्नाटकात नीर डोसा आणि केरळमध्ये अप्पम आणि पुट्टू. मात्र अनेकदा हे पदार्थ घरी बनवताना डोसा आणि इडली सारख्या अनेक गोष्टी व्यवस्थित बनवल्या जात नाहीत किंवा त्यांची चव नीट येत नाही. हे पदार्थ बनवताना काही चुका होऊ शकतात. अशा परिस्थितीत आपला पदार्थ व्यवस्थित बनण्यासाठी या चुका टाळल्या पाहिजे.

 

सांबार


अनेकदा घरी सांबार बनवताना त्याची चव योग्य नसेल, तर त्यामागील कारण सांबार मसाला योग्य प्रमाणात न घालणे असू शकते.

बरेच लोक बाजारातून स्वस्त सांबार मसाला खरेदी करतात जो ताजा नसतो आणि चवीलाही चांगला नसतो. अशा परिस्थितीत सांबारची चव बिघडू शकते.

घरच्या घरी ताजा सांबार मसाला बनवण्यासाठी लाल मिरची, धणे, मेथी, हरभरा डाळ, उडीद डाळ, हिंग, कढीपत्ता आणि नारळ भाजून आणि बारीक करुन घ्या. हा मसाला सांबारमध्ये घातल्याने सांबार अगदी चवीला लागतो.

 

 

 

रसम

रसम हा हलका आणि आंबट रस्सा आहे. तो बनवण्यासाठी टोमॅटो आणि मसाल्यांचा वापर केला जातो. तो बनवताना जास्त मसाले वापरू नयेत. कारण त्यामुळे चव कडू होऊ शकते. टोमॅटो आणि चिंच कमी घालून त्याचा आंबटपणा व्यवस्थित ठेवता येतो.

 

 

 

फोडणी देणे


साउथ इंडियन पदार्थांमध्ये फोडणी खूप महत्त्वाची असते. बरेच लोक फोडणी घालताना फक्त मोहरी घालतात आणि बाकीचे मसाले घालायला विसरतात. त्यामुळे पदार्थांची चव बिघडू शकते. म्हणून फोडणी बनवताना नारळाचे तेल किंवा तूप वापर करा. मोहरी, हिंग, कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या आणि मेथीचे दाणे देखील घालू शकता. त्यामुळे पदार्थांची चव वाढते.

 

 

इडलीचे पीठ

इडलीचा मऊपणा बॅटरवर अवलंबून असतो. कधीकधी तांदूळ आणि डाळीच्या प्रमाणाकडे योग्य नसल्याने इडली चवीला कडक किंवा आंबट होऊ शकते. म्हणून, इडलीसाठी बॅटर बनवताना, 3 वाटी तांदूळ असेल तर 1 वाटी उडीद डाळ घ्या. बॅटर 8 ते 12 तास उबदार जागी झाकून ठेवा जेणेकरून ते आंबेल. थंड हवामानात, तुम्ही दुपारी काही वेळ उन्हात झाकून ठेवू शकता.

 

 

डोसा


डोसा बनवताना, पीठ जास्त जाड किंवा पातळ नसावे. पीठ इतके पातळ करावे की ते तव्यावर सहज पसरेल. मात्र लक्षात ठेवा की पीठ तव्याच्या बाहेर येऊ नये. डोसा बनवण्यापुर्वी पीठ चांगले फेटून घ्या. तसेच, तव्यावर ग्रीस नसल्यामुळे डोसा व्यवस्थित बनवता येत नाही. यासाठी नॉन-स्टिक पॅन वापरावा जेणेकरुन डोसा तव्याला चिकटणार नाहि. तसेच डोसाचे पीठ योग्यरित्या आंबवले गेले पाहिजे.

 

 

 

नारळाची चटणी


नारळाची चटणी ही साउथ इंडियन जेवणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण कधीकधी त्याची चव बरोबर वाटत नाही. अशा परिस्थितीत चटणी बनवताना हिरव्या मिरच्या, भाजलेले हरभरा डाळ, आले आणि थोडे दही मिसळून चटणी बनवा. वर मोहरी, कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी घालणे देखील आवश्यक आहे. असे केल्याने नारळाची चटणा चविष्ट बनेल.