नव्या शैक्षणिक धोरणात ‘त्रिभाषा सूत्री’ला दाक्षिणात्य राज्यांचा विरोध!

386

नव्या शिक्षण धोरणात पाचकीपर्यंत मातृभाषेतून शिक्षणाची शिफारस करण्यात आली आहे. त्याबरोबरच ‘त्रिभाषासूत्री’नुसार हिंदी भाषा बंधनकारक करण्यात आली आहे. दाक्षिणात्य राज्यांनी याला विरोध केला आहे. तामीळनाडूचे मुख्यमंत्री इडाप्पाडी पलानीस्वामी यांनी कोणत्याही परिस्थितीत ‘त्रिभाषा सूत्री’ची अंमलबजावणी केली जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

हिंदी भाषा हा विषय आमच्या राज्यात संवेदनशील आहे. त्यामुळे तामीळनाडूत त्रिभाषा सूत्री लागू करणार नाही. इंग्रजी व तमीळ या दोन भाषांचाच समावेश शिक्षणात करण्यात येईल, असे पलानीस्वामी यांनी स्पष्ट केले आहे. राज्यांना शैक्षणिक धोरणात बदल करण्याचे स्वातंत्र्य द्यावे, अशी मागणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. तामीळनाडूच्या विरोधी पक्षांनी हिंदीला यापूर्वीच विरोध दर्शकला होता. द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी हिंदी आणि संस्कृत भाषेचा प्रचार करण्यासाठी त्रिभाषा सूत्री लादण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचा आरोप करत नव्या शैक्षणिक धोरणाला विरोध केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या