सोयाबीन हातचे गेल्याने शेतक-याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वलांडी लगतच असलेल्या अनंतवाडी ता. देवणी येथील शेतकरी रमेश आण्णाराव शेळके वय 55 वर्षे या शेतक-याने काढणीस आलेले सोयाबीन परतीच्या पाण्यात पूर्ण गेल्याने हताश होऊन शेतातील विहीरीत ऊडी मारून आत्महत्या केली आहे.

सदर शेतकरी हा कर्जबाजारी झाल्याने व तसेच जिल्हामध्यवर्ती बँकेसह इतर बँकेचेही कर्ज झाल्याने त्यांनी त्यांची शेतजमीनही विकली आहे त्यातच हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीकही हातून गेल्याने शेतकरी रमेश शेळके यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातलगांनी पोलीस पंचनानाम्यात सांगितले आहे.

सदर शेतक-यांचे वलांडी प्राथमीक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केले. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अनंतवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुलगे व एक मुलगी असा परिवार आहे.