
>> वैश्विक
अवकाशात घडणाऱ्या गमतींना गणतीच नाही. आपण कल्पनाही करू शकत नाही अशा गोष्टी विराट विश्वात क्षणोक्षणी घडत असतात. संशोधक नेहमीच निरीक्षण आणि त्यावरून सुचणाऱ्या कल्पनांचा मेळ घालून चिकित्सक पद्धतीने काही सूत्र मांडतात. या कल्पनाशक्तीबद्दल आइन्स्टाईन यानी म्हटलंय की ‘इमॅजिनेशन’ तुम्हाला सर्वदूर नेऊ शकते. असा वैज्ञानिक कल्पनाविलास अनेक महत्त्वाच्या शोधांना जन्म देऊन गेला. भास्कराचार्यांना ग्रहणांचं गणित आणि मर्म समजलं. टॉलेमी, कोपर्निकस यांनी त्यांच्या विचारानुसार ‘विश्वकल्पना’ मांडली. त्यातूनच पुढच्या काळात अधिक अभ्यासाला चालना मिळून आजची विश्वसंकल्पना थेट पह्टो घेण्यापर्यंतचा टप्पा गाठू शकली. अशा प्रकारची विधायक ‘दिवास्वप्नं’ पाहणाऱयांनीच अनेक सत्यांना जन्म दिला. आपल्या देशाने जागतिक गणिताला ‘शून्य’ प्रदान केलं तो अशाच कल्पनाशक्तीचा आविष्कार होता. त्यामुळे गणित किती ‘सोप्पं’ झालंय ते आपण अनुभवत आहोत.
सध्या पावसाळी दिवसांत आपण खगोलशास्त्रातील प्रत्यक्ष ‘आकाशदर्शना’चा विचारही करू शकत नाही. या चार महिन्यांच्या काळात काही महत्त्वाच्या खगोलीय संकल्पना साध्या-सोप्या शब्दांत स्पष्ट करण्याचा प्रयत्न करू या. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी असं म्हटलंय की सहा वर्षांच्या मुलाला तुम्ही एखादी गोष्टी समजावू शकत नसाल तर ती आपल्यालाच समजलेली नाही असं समजा. यातली अतिशयोक्ती जाऊ द्या पण ‘एक्स्पर्ट टू ले’ (तज्ञांनी सामान्यांना समजावून सांगणे) अशा कार्यक्रमांमधून आपल्याला जेवढी वैज्ञानिक माहिती असेल ती सुबोध पद्धतीने सर्वसामान्यांपर्यंत पोचवता आली पाहिजे. ‘खगोल मंडळा’च्या माध्यमातून आम्ही हे साध्य करण्याचा प्रयत्न केला. ‘एक्स्पर्ट’ असण्याचा दावा मात्र केला नाही. गेल्या 6 जुलै रोजी आमच्या संस्थेला 38 वर्षे पूर्ण झाली. त्याची आठवण झाली. या काळात अक्षरशः हजारो लोकांपर्यंत पोचत आमच्या कार्यकर्त्यांनी राज्यात, देशात आणि विदेशातही ‘आकाशदर्शन’ कार्यक्रम केले.
… तर विषय होता एखादा वैज्ञानिक विषय शक्य तितका सोपा करून सांगण्याचा. यासाठी गणिती भाग टाळूनही संकल्पनेच्या पातळीवर अनेक गोष्टी स्पष्ट करता येतात. त्यातूनच कोणी गहन विषयात अधिक अभ्यास करायला प्रोत्साहित होऊ शकतं. ‘ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग’ (गुरुत्वीय भिंग) ही म्हटलं तर कठीण, पण मनोरंजकही संकल्पना आहे. प्रकाशकिरण एका सरळ रेषेतच प्रवास करतो आणि त्याचं माध्यम बदललं, म्हणजे काच पिंवा पाण्यातून तो पसार झाला तर वक्र होतो असं जाणवतं. यासाठी आम्हाला शाळेमध्ये पाण्याच्या बादलीत बुडवलेली काठी दाखवली जायची. पाण्याच्या पृष्ठाखालील काठीच वाकडी झाल्यासारखी दिसायची. मात्र ती बाहेर काढून सरळच असल्याचं मास्तर स्पष्ट करायचे. मग हा ‘भास’ का होतोय याचं उत्तर असायचं माध्यम बदललेल्या प्रकाशाचं किंचित वक्रीभवन झाल्यामुळे.
अवकाशामध्ये प्रकाशाचं वक्रीभवन प्रचंड वस्तुमानाच्या प्रकाशाच्या मार्गात येणाऱया ताऱयामुळे पिंवा दीर्घिकेमुळे अथवा कृष्णविवरामुळे होऊ शकतं. याचा विचार न्यूटन यांनी 1704 मध्येच केला होता. आपल्या ‘ऑप्टिक्स’ या पुस्तकात त्यांनी तशी नोंद केली. त्यानंतर 1784 आणि 1801 मध्ये अनुक्रमे त्यावर अधिक भाष्य केलं आणि 1911 मध्ये आइन्स्टाईन यांनी गुरुत्वीय भिंग परिणामाला दुजोरा दिला. यामध्ये एखाद्या प्रकाशाच्या स्रोताच्या आणि निरीक्षकाच्या मध्ये प्रचंड वस्तुमानाची गोष्ट (दीर्घिका, कृष्णविवर वगैरे) तर पलीकडच्या ‘त्या’ वस्तूकडून येणारा प्रकाश या मधल्या वस्तूच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे वक्र होऊन दुभंगल्यासारखा झाल्याने त्यामागील वस्तूच्या दोन किंवा अधिक आभासी प्रतिमा दिसतात. सोप्या भाषेत हेच गुरुत्वीय भिंगाचे वर्णन चित्रातील ‘आइन्स्टाईन क्रॉस’मध्ये चार तारे दिसत असले तरी प्रत्यक्षात तो एकच असून मध्ये आलेल्या प्रचंड वस्तूमुळे तक्रीभवन झालेल्या प्रकाशाचा ‘गुरुत्वीय भिंग’स्वरूप परिणाम चार प्रतिमा दाखवत आहे.
याचा प्रत्यक्ष पुरावा डेनिस वॉल्श, बॉब कार्सवेल आणि रे वेमन यांना 1979 मध्ये मिळाला. अमेरिकेतील ‘किटपिक नॅशनल टेलिस्कोप’मधून निरीक्षण करताना एका क्वेसाराच्या (कितारा) त्यांना दोन प्रतिमा दिसल्या आणि हे जुळे ‘कितारे’ असल्याचा पिंतु त्यांच्या मनात निर्माण झाला. मात्र हा ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग पिंवा ‘गुरुत्वीय भिंग’ परिणाम असून त्यामुळे एकाच वस्तूच्या अशा दोन प्रतिमा दिसल्याचं स्पष्ट झालं. 1704 पासून न्यूटन यांनी केलेल्या संकल्पनेचं दृश्य उत्तर मिळण्यात 275 वर्षे गेली, परंतु त्यांचा खगोल विचार किती सखोल होता हे सिद्ध झालं. अशा अनेक संकल्पना आणि दुर्बिणींसारख्या अवकाश दर्शनासाठी आवश्यक असणाऱया गोष्टींचा मागोवा आपण या पावसाळी मेघाच्छादित आकाशाखाली असताना थोडय़ा अभ्यासातून घेऊ या.






























































