स्पॅल्प क्रूज मिसाइल, हॅमर, ब्राम्होस डागली

हिंदुस्थानी लष्कराने स्पॅल्प क्रूज मिसाइल, हॅमर, ब्राम्होस या क्षेपणास्त्रांसह स्पाईस 2000, पोपआय आणि सुदर्शन यांसारख्या बॉम्बगोळ्यांच्या माध्यमातून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. त्यामुळे हिंदुस्थान युद्धभूमीवर अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्याचे सिद्ध झाले. स्पॅल्प क्रूज मिसाइलद्वारे कमी दृश्यमानता असतानाही अचूक लक्ष्यभेद करता येतो. बंकर आणि कठीण लक्ष्यभेदही करता येतो.