जलयुक्त उदघाटन …

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजू हिंगे, पुणे

पुणे विद्येचे माहेरघर, विचारवंतांचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात जे खपते ते देशभर विकले जाते, असा लौकिक आहे. महापालिकेची स्थापना होण्यापूर्वी पुण्यात नगरपालिका होती. या नगरपालिकेचे कामकाज विश्रामबागवाडा येथुन होत असे. या नगरपालिकेचे महात्मा ज्योतिबा फुले, आचार्य अत्रे यांच्यासारखे दिग्गज सभासद होते. फुले आणि अत्रेंनी या नगरपालिकेत कामाचा ठसा उमटविला, अमोघ वक्तृत्वाने अनेक प्रथा आणि परंपरांवर आसूड ओढले.त्यानंतर या नगरपालिकेचे पुणे महापालिकेत रूपांतर झाले.  शिवाजीनगर येथे १९५७ पालिकेची इमारत बांधण्यात आली. पुण्याचे पहिले महापौर बाबूराव सणस, ना. ग. गोरे, बाबूराव जगताप, भाऊसाहेब शिरोळे, गणपतराव नलावडे , भाई वैघ,यांच्यासारखे अनेक दिग्गज नेते या पालिकेत झाले. पालिकेच्या इमारतीचा १९९२  मध्ये विस्तार करण्यात आला. पालिकेची होणारी हदद वाढ आणि वाढती लोकसंख्या याचा विचार करुन १५ मे २०१५ रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पालिकेच्या विस्तारीत इमारतीचे भुमिपुजन करण्यात आले. तीन वर्षानंतर म्हणजे २१ जुन २०१८ रोजी या विस्तारी इमारतीचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित उदघाटन झाले. पण सत्ताधारी भाजपने केलेल्या दिमाखदार उदघाटन सोहळयाला

पाण्याच्या गळतीचा डाग  लागला. पन्नास कोटी रूपये खचॆ करुन बांधलेल्या इमारतीच्या   गळतीने पालिकेच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली.त्यावरुन सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षामध्ये आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे

 अपुर्ण कामाकडे दुर्लक्ष करणे पडले महागात 

विस्तारीत इमारतीच्या उदघाटनाच्या दिवशीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सकाळीच या कामाची पाहणी केली. इमारतीच्या घाईघाईमध्ये  उरकण्यात आलेल्या कामाबद्दल त्यांनी  जाहीर नाराजी व्यक्त केली. इमारतीच्याकामा बाबत अनेक प्रश्न विचारून कडक शब्दांत अधिकार्यांची  हजेरी घेतली.  त्यापुर्वी या इमारतीच्या अपुर्ण कामा बाबत विरोधीपक्षांनी महापौर आणि आयुक्तांना पत्र दिले होते. पण त्याकडे केलेले  दुर्लक्ष महागात पडले आहे.   नवीन इमारतीच्या कोनशिलेवर आपले नाव यावे या मोहापोटी काही पदाधिकार्यांच्या दबावाखाली घाईत उदघाटन केले असा आरोप विरोधीपक्षांनी केला होता. जलयुक्त उद्घाटनामुळे  हे आरोप खरे असल्याची एक प्रकारे पुष्टी  मिळाली . माञ   या  इमारतीचे काम अपूर्ण असल्याचे आरोप महापौर मुक्ता टिळक यांनी फेटाळुन  कचरा साचल्याने पाणी गळती झाल्याची सारवासारव केली. हे काम करणार्या संबंधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे आदेश देण्यात   आले आहेत . त्या ठेकेदारावर आगामी काळात कारवाईही होईल. पण हे उदघाटन घाईघाईत करायला लावणारे  पालिकेतील सत्ताधारी आणि त्यांना  साथ देणारे अधिकारी तितकेच जबाबदार आहेत.त्यांच्यावर कारवाई करणार असा सवाल केला जात आहे. जलयुक्त उदघाटनाने  कारभाराची पुरती  लाज निघाली . या इमारतीच्या उदघाटनाचा विषय ज्या ज्या वेळीस निघेल त्या त्या वेळी पाणी गळतीची आठवण निघणार आहे.  त्यामुळे गळतीचा हा  डाग  आता पुसता येणे कठिण आहे.

गळतीची सोशल मिडीयावर धुलाई 

विस्तारीत इमारतीत झालेल्या गळतीचे फोटो , व्हिीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले. व्हॉटसॉफ , फेसबुकवर अक्षरक्ष पालिकेच्या कारभाराची खिल्ली उडविण्यात आली. त्यातुन  अनेकांनी नाराजी व्यक्त केली. ‘भोगा आता कमळाची फळे.. पुणे महापालिकेत पाणी थेंब थेंब गळे…,’ ‘ छे ते छत नव्हे पुणेकरांच नशिब गळक निघाल…’ असे मेसेज फिरत होते.

डयुटीफुल काम होणार का ?

पालिकेची नवीन इमारत ब्युटीफुल आहे.मात्र, तिथे काम ड्युटीफुल व्हायला हवे अशी अपेक्षा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली.   त्याप्रमाणे आता तरी पालिकेचे कामकाज सत्ताधारी आणि पालिका प्रशासन डयुटीफुल करणार का  हे आगामी काळच सांगु शकणार आहे