मराठा आरक्षणासंदर्भात विशेष सल्लागार समितीची स्थापना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणासंदर्भात स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीला सहाय्य करण्यासाठी विशेष सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्या समितीमध्ये आमदार प्रवीण दरेकर, भरत गोगावले, योगेश कदम आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. मराठा समाजाच्या मागण्यांच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याठी ही सल्लागार समिती उपसमितीला सहाय्य करणार आहे.

मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीबाबत राज्य मागासवर्ग आयोगाने अहवाल सादर केला होता. त्या अहवालातील शिफारशींवर कार्यवाहीसाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळ उपसमिती नेमली होती. त्या उपसमितीला सहाय्य करण्यासाठी विशेष सल्लागार समिती स्थापन करण्याचा निर्णय गेल्या 11 ऑक्टोबर रोजी घेण्यात आला होता. त्यानुसार विशेष सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे.