विसर्जनासाठी विशेष लोकल

गणपती विसर्जनाच्या दिवशी अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मुंबईत विशेष रेल्वे लोकल धावणार आहेत. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे मार्गावर या लोकल उशिरापर्यंत धावणार आहेत. तसेच हार्बर मार्गावरसुद्धा अतिरिक्त लोकल सोडण्यात येणार आहेत. 4 सप्टेंबर ते 7 सप्टेंबरपर्यंत या लोकल धावणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हून कल्याणसाठी लोकल 1.40 वाजता सुटेल ती कल्याणला 3.10 वाजता पोहोचेल, सीएसएमटीहून ठाण्यासाठी 2.30 वाजता लोकल सुटणार असून ती 3.30 वाजता पोहोचेल. तर सीएसएमटीहून कल्याणसाठी 3.25 वाजता सुटणारी लोकल 4.55 वाजता पोहोचेल. कल्याणहून सीएसएमटीकडे 12.5 वाजता सुटणारी लोकल 1.30 वाजता पोहोचेल. ठाण्याहून सीएसएमटीकडे 1 वाजता सुटणारी लोकल रात्री दोन वाजता पोहोचेल.

ठाण्याहून 2 वाजता सुटणारी लोकल 3 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. हार्बर मार्गावरसुद्धा उशिरापर्यंत लोकल धावणार आहेत. सीएसएमटीहून पनवेलसाठी 1.30 वाजता सुटणारी लोकल 2.50 वाजता पोहोचेल. सीएसएमटीहून 2.45 वाजता सुटणारी लोकल पनवेलला 4.05 वाजता पोहोचेल. पनवेलहून 1 वाजता निघणारी लोकल 2.20 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.