Ganpati Bappa Morya यंदा गणपती बाप्पासाठी बनवा ‘हे’ हटके मोदक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोदक हा गणपतीचा आवडता नैवेद्य. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी बाप्पाच्या नैवेद्यात मोदक हमखास असतोच.

मावा बडिशेपचे मोदक

साहित्य – 1 कप तांदळाचं पीठ, तेल, दीड कप पाणी, मीठ, गुलाबपाणी, पाव किलो मावा, 70 ग्राम साखर, 2 टीस्पून बडिशेप, किसलेले पिस्ता, कापलेले अंजीर

जाड बुडाच्या पातेल्यात खवा, साखर, बडिशेप, पिस्ता व कापलेले अंजीर एकत्र करा. मंद आचेवर साखर वितळेपर्यंत शिजवा. गॅस बंद करा व मावा प्लेटमध्ये काढून घ्या. उकडीच्या मोदकांसाठी बनवतो तशी तांदळाच्या पीठाची उकड बनवून घ्या. ती उकड व्यवस्थित मळून घ्या. त्यात खव्याचे सारण भरा व मोदक वळून घ्या. नंतर मोदक स्टिमर मध्ये मोदक स्टिम करून घ्या.

गुलकंद पान फ्लेवरचा मोदक

साहित्य – 5 विड्याची पान, आवडीनुसार कमी जास्त साखरेची पूड, 2 वाट्या ओल्या नारळाचा चव, 1 वाटी गुलकंद, वेलची पावडर, अर्धी वाटी दूध, 1 टी स्पून वेलची पावडर.

विड्याची पानं स्वच्छ धुवून दूध घालून मिक्सरला वाटून घ्यावी. कढईमध्ये खवलेला नारळ, साखर घालून मंद आचेवर भाजत ठेवाव. मिश्रण सतत ढवळत रहावं. थोडं गरम झालं ती त्यात वेलची पावडर व गुलकंद घालावा. मिश्रण कढईच्या कडेनं सुटू लागलं की गॅस बंद करावा. मिश्रण थंड झालं की मोदक साच्यात घालून मोदक तयार करावेत.

बिस्किट मोदक

साहित्य – अर्धा कप मिल्क पावडर, अर्धा कप मारी बिस्किटटा चुरा, अर्धा कप अक्रोडचा चूरा, अर्धा कप डेसिनेटेड नारळ, 1 चमचा तूप, 1 टेबल स्पून थंड दूध

कृती –
एका भांड्यात मिल्क पावडर, बिस्किट पावडर, नारळ पावडर एकत्र करून त्यात थंड दूध घालावे. त्याचे मोदक वळावे. अक्रोडच्या चुऱ्यावर हे मोदक फिरवावे. अक्रोडचा चुरा त्या मोदकाला चिकटला की ते मोदक सेट व्हायला 15 मिनिटं फ्रिजमध्ये ठेवावे.

चॉकलेट मोदक

साहित्य – 1 कप रिकोटा चीझ, 1 कप कंडेन्स्ड मिल्क, अर्धा कप चॉकलेट चिप, एक टेबलस्पून कोकोआ पावडर

साहित्य – एका जाड बुड्याच्या पॅनमध्ये रिकोटा चीझ घ्या. ते पॅन मंद आचेवर ठेवा व पाच ते आठ मिनिटं ढवळत रहा. त्यानंतर त्यात कंडेन्स्ड मिल्क घाला व पाच मिनिटं शिजवा. गॅस बंद करा. त्या मिश्रणात कोकोआ पावडर घाला. त्यानंतर ते पूर्ण थंड झाले की त्यात चॉकलेट चिप घाला. त्यानंतर त्याचे छोटे गोळे करून मोदकाच्या साच्याने मोदक बनवा.