
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून प्लॅनेट मराठी ओटीटीवर ‘लाभले आम्हांस भाग्य’ हा विशेष कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कार्यक्रमाचे लेखन, दिग्दर्शन पुष्कर श्रोत्री यांनी केले असून यात प्रमुख भूमिका आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री आणि संदीप पाठक यांनी साकारली आहे.
‘लाभले आम्हांस भाग्य’बद्दल दिग्दर्शक, अभिनेता पुष्कर श्रोत्री म्हणाला, ‘‘या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश कोणाला भाषा शिकवणे, उपदेश करणे हा नसून, आम्हाला मराठी भाषा बोलताना जो आनंद मिळतो तो तुम्हीसुद्धा घ्यावा, हा एवढाच या मागचा उद्देश आहे. हसतखेळत मराठी भाषेचे वैभव दाखवण्याचा प्रयत्न आम्ही यातून केला आहे.’’