
सामना ऑनलाईन । ऑकलंडट
हिंदुस्थानचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने करण जोहर याच्या कॉफी विथ करण कार्यक्रमात महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्याच्यावर बीसीसीआयने निलंबनाची कारवाई केली होती. त्या प्रकरणानंतर पंड्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. निलंबनामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकलेल्या पंड्याने न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन केले. मात्र अद्याप लोकांचा पंड्यावरील रोष कमी झालेला नाही. न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात एका महिलेने पंड्याला खिजविण्यासाठी चक्क ‘पंड्या आज करके आया क्या’ असे पोस्टर झळकवले होते. या महिलेचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून लोकं पंड्याला ट्रोल करत आहेत.
give this lady a Bharat Ratna#INDvNZ pic.twitter.com/PQA8KtGNFB
— Sunil- The cricketer (@1sInto2s) February 8, 2019
हार्दिक पंड्या व लोकेश राहुल यांनी कॉफी विथ करण या कार्यक्रमात महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. पंड्याने तो सेक्स करून आल्यानंतर त्याच्या आई वडिलांना ‘आज मै करके आया’ असे सांगत असल्याचे त्याने त्या कार्यक्रमात सांगितले होते. तसेच पब डिस्कोमध्ये तो मुलींना फक्त न्याहाळत बसतो अशी वादग्रस्त वक्तव्य केली होती. हा शो टेलिकास्ट झाल्यानंतर नेटकऱ्यांनी पंड्या व राहूलवर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग व हरभजन सिंग यांनी देखील त्यांचे कान उपटले होते. त्यानंतर बीसीसीआयने त्या दोघांवर निलंबनाची कारवाई केली होती. त्यामुळे राहूल व पंड्याला ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतावे लागले होते.


























































