फिरकीपटूंनी गाजवलीय स्पर्धा, सर्वाधिक बळी बाद करणाऱयांच्या यादीत स्पिनर्सचा ठसा

260

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱयांच्या यादीत हिंदुस्थानी फलंदाजांनी बाजी मारलीय. तसेच जागतिक स्तरावर उदंड प्रतिसाद लाभत असलेल्या या टी-20 लीगमध्ये फिरकीपटूंनी गोलंदाजीत कमाल करून दाखवलीय. सर्वाधिक बळी बाद करणाऱयांच्या पहिल्या 10 गोलंदाजांच्या यादीत सहा फिरकी गोलंदाज आहेत हे विशेष. मुंबई इंडियन्सचा लसिथ मलिंगा 122 सामन्यांमधून 170 फलंदाज बाद करीत पहिल्या स्थानावर आहे. या वर्षी 19 सप्टेंबरपासून यूएईत खेळवण्यात येणाऱया आयपीएलमध्ये कोणकोणते गोलंदाज आपली धमक दाखवताहेत हे पाहणे रंजक ठरणार आहे.

पर्पल कॅपमध्ये मात्र वेगवान गोलंदाज अग्रेसर

सर्वाधिक बळी बाद करणाऱया गोलंदाजांच्या यादीत फिरकीपटूंचे वर्चस्व दिसून आले असले तरी प्रत्येक वर्षी बक्षिसाच्या रूपात देण्यात येणाऱया पर्पल कॅपच्या शर्यतीत वेगवान गोलंदाज सरस ठरले आहेत. 2010 साली प्रज्ञान ओझाने डेक्कन चार्जर्ससाठी खेळताना 21 बळी मिळवत पर्पल कॅप मिळवली होती. तसेच गेल्या वर्षी इम्रान ताहीरने चेन्नई सुपरकिंग्ससाठी खेळताना 26 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत पहिल्या स्थानावर झेप घेतली होती. पण पहिल्या 12 वर्षांमध्ये हे दोन फिरकी गोलंदाज वगळता इतर वर्षी वेगवान गोलंदाजांनी पहिले स्थान पटकावले आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक

बळी मिळवणारे गोलंदाज

लसिथ मलिंगा          (170 बळी)

अमित मिश्रा (157 बळी)

हरभजन सिंग           (150 बळी)

पीयूष चावला          (150 बळी)

ड्वेन ब्राव्हो    (147 बळी)

भुवनेश्वरकुमार         (133 बळी)

रवीचंद्रन अश्विन       (125 बळी)

सुनील नरीन (122 बळी)

उमेश यादव   (119 बळी)

रवींद्र जाडेजा           (107 बळी)

टीप ही यादी सर्वोत्तम 10 गोलंदाजांची आहे.

टीम इंडियाचेच गोलंदाज पुढे

आयपीएल ही हिंदुस्थानातील स्पर्धा. त्यामुळे टीम इंडियातील खेळाडूंचीच या स्पर्धेत चमक दिसून आल्यास आश्चर्य वाटायला नको. फलंदाजीप्रमाणे गोलंदाजी यादीतही हिंदुस्थानी खेळाडू अधिक असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या