
सामना ऑनलाईन । गॉल
ऑफस्पिनर दिलरुवान परेरा आणि अनुभवी फिरकी गोलंदाज रंगाना हेराथ यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर यजमान श्रीलंकेने येथे झालेल्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव ७३ धावांमध्येच गारद केला आणि २७८ धावांनी दणदणीत विजयावर मोहोर उमटवली. दिलरुवान परेराने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ६ फलंदाज बाद करीत कसोटी १० बळी गारद केले. द. आफ्रिकेची ७३ ही धावसंख्या १९९२ सालानंतरची नीचांक ठरली.





























































