टी-20 वर्ल्ड कपसाठी विक्रम राठोड देणार श्रीलंकेला फलंदाजीचे धडे

आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीला गती देताना श्रीलंका क्रिकेट बोर्डाने विक्रम राठोडची फलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. हिंदुस्थानचा माजी फलंदाजी प्रशिक्षक असलेला राठोड 18 जानेवारीपासून 10 मार्चपर्यंत सल्लागार म्हणून काम पाहणार आहे. त्याच्या अनुभवाचा वर्ल्ड कप 2026 च्या तयारीत फायदा करून घेण्याचा बोर्डाचा प्रयत्न आहे. याशिवाय दिग्गज लसिथ मलिंगाची 40 दिवसांसाठी वेगवान गोलंदाजी सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. श्रीलंका ग्रुप ‘बी’ मध्ये ऑस्ट्रेलियासह चार संघांविरुद्ध खेळणार आहे.