
श्रीलंकेत जेलमध्ये दंगल उसळली असून जवळपास आठ कैद्यांचा मृत्यू झाला आहे तर 37 जण जखमी झाले आहेत. रविवारी कोलंबोपासून 15 किमी अंतरावर असणाऱया महारा जेलमध्ये ही दंगल झाली. काही कैद्यांनी जेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा प्रकार घडला.
महारा कारागृहातील कैद्यांनी दरवाजातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी कारागृह प्रशासनाला त्यांच्याविरोधात बळाचा वापर करावा लागला अशी माहिती पोलिसांनी दिला आहे. कैद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल होता. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कारागृह अधिकाऱयांना कठोर कारवाई करावी लागली. कैद्यांनी यावेळी किचन तसंच रेकाॅर्ड रुमला आग लावल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली आहे. हिंसाचारात जखमी झालेल्यांत दोन जेलरचाही समावेश आहे.






















































