#SriLankaBlasts मोदींनी केला निषेध, राष्ट्रपती व पंतप्रधानांशी केली फोनवर चर्चा

30

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

श्रीलंकेमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. मोदींनी या संदर्भात श्रीलंकेचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांशी फोनवर चर्चा केली. दहशतवादी हल्ल्यामध्ये आतापर्यंत जवळपास 200 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांना श्रद्धांजली वाहत मोदींनी संपूर्ण देशवासियांकडून मृतांप्रति संवेदना व्यक्त केली.

श्रीलंकेत बॉम्बस्फोटाची मालिका सुरूच; स्फोटांची संख्या आठवर, कोलंबोमध्ये कर्फ्यू

पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, हे थंड रक्ताने केलेले खून आहेत. हा हल्ला पूर्वनियोजित असून यामुळे हिंदुस्थान आणि शेजारील राष्ट्रांसह जगभरात दहशतवादाचा मुद्दा किती गंभीर आव्हान आहे, असेही मोदी म्हणाले. तसेच दहशतवादाला उखडून टाकण्याचे आवाहनही त्यांनी जगभरातील राष्ट्रांना केले आहे.

दरम्यान, रविवार सकाळपासून श्रीलंकेमध्ये 8 साखळी बॉम्बस्फोट झाले असून यात 187 लोक ठार, तर 500 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. जखमींची संख्या जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बॉम्बस्फोटांच्या मालिकेनंतर श्रीलंकेतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, तसेच कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या