श्रीलंकेत कोलंबो विमानतळावर अजून एक जिवंत बॉम्ब सापडला

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

श्रीलंकेत रविवारी झालेल्या आठ साखळी बॉम्ब स्फोटानंतर सोमवारी सकाळी कोलंबो विमानतळावर जिवंत बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली. पण बॉम्ब शोध पथकाने हा बॉम्ब लगेचच निष्क्रिय केला. यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि :श्वास सोडला.

दरम्यान, श्रीलंकेत रविवारी अनेक चर्च व हॉटेलमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. ईस्टर संडे असल्याने नागरिकही उत्साहात होते. मात्र त्याचवेळी चर्चेमध्ये जोरदार धमाका झाला व बघता बघता परिसरात रक्तामांसाचा स़डा पडला. यात चार हिंदुस्थानी नागरिकांसह 290 लोकांचा मृत्यू झाला असून साडेचारशे हून अधिक जण जखमी आहेत. गंभीर रुग्णांची संख्या अधिक असल्याने मृत्यू पडलेल्यांच्या संखेत वाढ होण्याची भिती व्यक्त केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत  24 संशतितांना अटक कऱण्यात आली आहे. मृतांमध्ये चार हिंदुस्थानींचा समावेश आहे. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.  तर श्रीलंकेत सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे.