बैलांमुळेच श्रीनिवासची विक्रमी धाव; लंडनमधील ‘गार्डियन’ने केले वृत्त प्रसिद्ध

531

श्रीनिवास गौडा याने कर्नाटकातील ‘कंबाला’ या पारंपरिक शर्यतीत 100 मीटरचे अंतर 9.55 अशा विक्रमी वेळेसह पूर्ण केले. त्यानंतर श्रीनिवास गौडा रातोरात स्टार झाला. श्रीनिवासचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक मान्यवर व्यक्तींनी या अफलातून धावपटूला ऑलिम्पिकसाठी प्रशिक्षण देण्याची मागणी केली. याप्रसंगी हिंदुस्थानचा युसेन बोल्ट म्हणून ओळखला जात असलेल्या श्रीनिवास गौडा याला बैलांच्या आधारावरच विक्रमी धाव घेता आली, अशा प्रकारचे वृत्त लंडनमधील ‘गार्डियन’ या वृत्तपत्रामधून प्रसिद्ध करण्यात आले. या वृत्तामुळे श्रीनिवास गौडा याच्या कामगिरीवर शंका उपस्थित होत असून चाहत्यांमधूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

या वृत्तात एका तज्ञांकडून पुढे सांगण्यात आले की, श्रीनिवास गौडा तरुण चपळ आहे. त्याचे शरीर दणकट आहे, पण माणसांपेक्षा बैल अधिक वेगवान धावू शकतात ही साधी गोष्ट आहे. त्याचे काम त्यांना सरळ नेण्याचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या