दहावीच्या विद्यार्थ्यांना उद्यापासून हॉलतिकीट मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मार्च-एप्रिलमध्ये होणाऱया दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवार, 18 फेब्रुवारीपासून हॉलतिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे. मुख्याध्यापकांनी या ऑनलाइन हॉलतिकिटाचे प्रिंट विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी शाळांना दिल्या आहेत.

राज्य शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या वेबसाईटवर दुपारी 1 वाजल्यापासून स्कूल लॉगीनमध्ये डाऊनलोड करण्यासाठी हॉलतिकीट मिळणार आहे. काही तांत्रिक अडचणी आल्यास शाळांनी विभागीय शिक्षण मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहनही भोसले यांनी केले आहे. हॉलतिकिटासाठी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारू नये तसेच विषय आणि माध्यम बदलासंबंधीच्या सूचना विभागीय शिक्षण मंडळावर करायच्या आहेत. विद्यार्थ्यांकडून हॉलतिकीट गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्याला दुसरी प्रिंट द्यायची असून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा असणार आहे.