पोलीस बंदोबस्तात दहावीची परीक्षा सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ssc-exam
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । धुळे

नाशिक विभागीय शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. जिल्ह्यातील 63 केंद्रांवर 29 हजार 715 विद्यार्थी यंदा दहावीची परीक्षा देत आहेत. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी  परीक्षा केंद्रांजवळ पोलीस बंदोबस्त आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी दिली. परीक्षा पार पाडण्यासाठी जिल्ह्यात 63 केंद्रे आहेत. परीक्षेवर नियंत्रण राहण्यासाठी सहा उपकेंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. धुळे तालुक्यातुन 6 हजार 293, साक्री तालुक्यातून 6 हजार 387, शिरपूर तालुक्यातून 5 हजार 140 तर शिंदखेडा तालुक्यातून 4 हजार 584 विद्यार्थी परीक्षा देत आहेत.