
फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता दहावी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत.
इयत्ता बारावीसाठी 10 फेब्रुवारी, ते 18 मार्च, या दरम्यान तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारी, ते सोमवार, 9 फेब्रुवारी, या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.
इयत्ता दहावीसाठी 20 फेब्रुवारी, 2026 ते 18 मार्च, 2026 या दरम्यान तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा (शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह) 02 फेब्रुवारी, 2026 ते 18 फेब्रुवारी, 2026 या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.
            
		





































    
    





















