दहावीचा समाजशास्त्राचा पेपर फुटला, व्हॉट्सअॅपवर व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भिवंडी

सध्या राज्यात दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा सुरू आहे. दरम्यान, आज सकाळी समाजशास्त्र विषयाचा पेपर भिवंडीतील एका शाळेतून फुटल्याची घटना समोर आली आहे. व्हॉट्सअॅपवरून पेपर व्हायरल झाल्यानंतर याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दहवीच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या जीवनातील टर्निंग पॉईंट मानल्या जातात. शालेय जीवनात या परीक्षेला अत्यंत महत्व आहे. त्यामुळेच कॉपी, पेपर फुटणे असे प्रकार रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र असे असताना देखील आज भिवंडीत समाजशास्त्राचा पेपर परीक्षा सुरू होण्याच्या अर्धातास आधी फुटला. व्हॉट्सअॅपवरून हा पेपर व्हायरल झाला. याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात येत आहे. दरम्यान, याआधी देखील अशीच पेपर फुटीची घटना या भागात घडली होती. मात्र त्यानंतर देखील योग्य ती काळजी न घेतल्याने पुन्हा एकदा पेपर फुटल्याचे सांगण्यात येत आहे. पालकांनी मात्र याघटनेनंतर शिक्षण विभाग आणि बोर्डावर नाराजी व्यक्त केली आहे.