
खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात कराड – तासगाव मार्गावर एसटी पलटी झाली. दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात श्रीरंग माने (वय 40) यांचा मृत्यू झाला झाला आहे. यामध्ये दोन महिला आणि एक पुरुष गंभीर जखमी झाले. तसेच बसमधील सुमारे 40 प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत.
मेढ्याहून पलूसकडे (जि.सांगली) निघालेली एसटी दत्त पेट्रोल पंपाजवळ पलटी झाली. यावेळी उपस्थित नागरिकांनी एसटीमधून लोकांना बाहेर काढले. दरम्यान यावेळी जखमी झालेले खुबी माने हे एसटीतून अन्य जखमींसोबत बाहेर काढल्यावर काही अंतर चालत आले. मात्र काही अंतरावर ते कोसळले. त्यानंतर अन्य जखमींसह त्यांना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र वाटेतच त्यांनी प्राण सोडले.




























































