एसटीत 448 चालक कम वाहकांची नियुक्ती, 2019च्या भरतीतील रखडलेल्या उमेदवारांची नेमणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी महामंडळातील 2019च्या भरती प्रक्रियेतील पात्र 448 चालक कम वाहकांना अखेर नेमणूक पत्र देण्यात आले आहे. प्रशिक्षण होऊनही त्यांची नेमणूक कोरोनाच्या साथीमुळे झाली नव्हती. त्यांना दोन वर्षांनी नियुक्ती मिळाली असून त्यात जळगाव आणि धुळे जिह्यातील सर्वाधिक नेमणुका झाल्या आहेत.

एसटी महामंडळामध्ये 2019 मध्ये चालक तथा वाहक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरती प्रक्रियेतील 1431 पात्र उमेदवारांची यापूर्वीच नेमणूक झाली होती. मात्र, गेली दोन वर्षे कोरोनामुळे ही भरती प्रक्रिया थांबली होती. त्यानंतर रखडलेल्या उर्वरित पात्र उमेदवारांच्या नेमणुकीला अखेर राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.