एसटीलाही कोरोनाचा विळखा; आतापर्यंत एकूण 49 जण कोरोनाबाधित

प्रातिनिधिक फोटो

एसटी महामंडळाच्या 49 कर्मचाऱयांना कोरोना झाला असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. यात कंडक्टर आणि ड्रायव्हरची संख्या सर्वाधिक असून कुर्ला नेहरू नगर आगाराच्या कर्मचाऱयांना सर्वाधिक कोरोनाची लागण झाली असल्याचे उघड झाले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आतापर्यंत दूर असलेल्या एसटी महामंडळातील कर्मचाऱयांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले असून कुर्ला नेहरू नगर आगाराच्या 21 कर्मचाऱयांना लागण झाली आहे. त्यानंतर पनवेल आगाराच्या 10, परळ आगाराच्या 8 अशा एकूण 49 कर्मचाऱयांना कोरोनाचा आजार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या