परजिल्ह्यातून आलेल्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये नेत असताना एसटी चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

781

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महामार्गावरील कशेडी येथे सुरु करण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर कार्यरत असलेल्या एका एसटी कर्मचाऱ्याचे कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. नितीन नलावडे (३२) असे या दुर्देवी कर्मचाऱ्याचे नाव आहे.

मुंबई, पुणे यासारख्या रेड झोन मधून कोकणात येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी येथे तपासणी नाका सुरु करण्यात आला आहे. या ठिकाणी कर्तव्यावर असलेले महसूल, पोलीस, व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्याकडून मुंबई पुणे, ठाणे येथून येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जाते. त्यानंतर त्यांना चेकनाक्यावर तैनात ठेवलेल्या एसटी बसने क्वारंटाईन सेंटरवर नेऊन 14 दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाते.

नितीन नलावडे हे एसटी चालक हेच कर्तव्य बजावण्यासाठी मंगळवारी रात्री कशेडी येथे कर्तव्यावर होते. बुधवारी सकाळी 6 वाजून दहा मिनिटाच्या सुमारास ते मुंबई, पुणे येथून आलेल्या नागरिकांना घेऊन लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहातील क्वारंटाईन सेंटरकडे निघाले होते. ते एसटी सुरू करणार इतक्यात अचानक त्याच्या छातीत दुखू लागले. वेदना असह्य झाल्याने ते एसटीतून खाली उतरला मात्र त्याला उभे राहणे शक्य न झाल्याने रस्त्यातच पडले.

आपली प्रतिक्रिया द्या