लातूरमध्ये एसटी बससेवा सुरु; मुख्य बसस्थानकात प्रवाशांची गैरसोय

977

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसची सेवा शुक्रवारपासून काही जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे. ही सेवेसाठी आसनक्षमतेच्या 50 टक्के प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. तसेच कोरोना रोखण्यासाठीच्या सूचनांचे पालन करणेही गरजेचे आहे. एसटी बससेवा सुरू झाली असली तरी लातूर शहरातील मुख्य स्थानकातील प्रवाशांची अडचण होत आहे.

लातूर जिल्ह्यात शुक्रवारपासून एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. लातूर शहरातील बस स्थानक क्रमांक 1 हे मुख्य बसस्थानक आहे. मात्र, या बसस्थानकातून बसेस न सोडता तीन किलोमीटर अंतरावरील अंबाजोगाई रोडवरील बसस्थानक क्रमांक 2 वरुन सोडण्यात येत आहेत. त्यामुळे ग्रामिण भागातून, तालूक्याच्या ठिकाणावरुन लातूर शहरातील मुख्य बाजारपेठेत येण्यासाठी रिक्षाला अधिक खर्च करावा लागणार आहे. विशेष म्हणजे एस.टी.बसेसची वाहतूक रिंगरोडवरुन करण्याचेही आदेशात नमूद करण्यात आलेले आहे. तरीही मुख्य बाजारपेठेपासून दूर अंतरावर असणऱ्या बसस्थानकाचा वापर होत असल्याने नागरिकांसाठी ते गैरसोयीचे ठरत आहे. शहरातील मुख्य बसस्थानकाचा वापर जिल्हा प्रशासनाने वाहनांच्या पार्किंगसाठी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच मुख्य बसस्थानकामधून एस.टी.बसेस न सोडता त्या बस स्थानक क्रमांक 2 वरून सोडल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या