एस.टी चालकाने घेतला गळफास; अकस्मात मृत्यूची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, चारठाणा

जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील जिंतूर आगारातील एस.टी.चालक म्हणून कार्यरत चालक त्र्यंबक उर्फ बबन रामचंद्रराव चव्हाण हे मागील आठ वर्षापासून एस.टी. महामंडळात चालक या पदावर कार्यकरत होते. परंतु अपघाताने नैराश्य आलेल्या त्र्यंबक चव्हाण यांनी आज रविवारी रोजी पाहाटे ग्रामपंचायतच्या बंद पाण्याच्या टाकीला गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, मागील वर्षी अहमदनगर येथे झालेल्या अपघातात त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. तेव्हा पासून त्यांचे मानसिक संतुलन व्यवस्थित नसल्याने नैराश्यग्रस्त जीवन जगत होते. शनिवार, २ रोजी सकाळी ड्युटीवर जातो म्हणून घरातुन निघून गेले, ते परत आलेच नाही. आज सकाळी चारठाणा फाट्या जवळील ग्रामपंचायतच्या बंद पाण्याच्या टाकीला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदह आढळून आला.

सदर घटनेबाबतीत त्यांच्या लहानभाऊ मुकुंद रामचंद्र चव्हाण (रा. चारठाणा) यांनी दिलेल्या माहीतीवरून चारठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक रत्नाकर घोळवे, बिट जमादार सूर्यकांत राऊत, पोलीस कॉस्टेबल बळीराम ईगारे, गुलाब भिसे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनाम्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांनाच्या स्वाधीन केले. त्र्यंबक चव्हाण यांच्या पाश्चात पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.