एस.टी.च्या ताफ्यात 500 नवीन बस येणार

सामना प्रतिनिधी । मुंबई

एस.टी.च्या ताफ्यात 500 नवीन बस येणार आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला बसेस खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी देण्यात येईल अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. बस खरेदीसाठी लागणाऱया निधीपैकी 12.5 कोटी रुपयांचा निधी नजीकच्या काळात तर उर्वरित निधी हा विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात उपलब्ध करून दिला जाईल असे सांगून अर्थमंत्री म्हणाले की, आज एस.टी. बस ही ग्रामीण महाराष्ट्राचा आधार आहे. सर्वसामान्य माणसांची ही गरज लक्षात घेऊन त्यांना चांगल्या एस.टी. बसमधून प्रवास करता यावा हा त्यामागचा उद्देश आहे. महामंडळानेही पुढाकार घेऊन एस.टी. बसस्थानके सुंदर आणि स्वच्छ ठेवावीत असे आवाहन त्यांनी यावेळी केले.