शिवजयंती कार्यक्रमादरम्यान शिवनेरी किल्ल्यावर चेंगराचेंगरी, लहान मुलांसह महिला जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या ऐतिहासिक शिवनेरी गडावर शिवजयंतीच्या उत्सवादरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत महिला व लहान मुलांसह अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किल्ल्यावरील अंबरखाना परिसरातील अरुंद दरवाजात शिवभक्तांची प्रचंड गर्दी झाल्याने ही चेंगराचेंगरी झाल्याचे समजते.

शिवजयंती निमित्त दरवर्षी राज्यभरातून लाखो शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर येतात. यंदाही शिवजयंतीच्या पूर्वसंध्येपासून किल्ल्यावर शिवभक्तांची गर्दी झाली होती. मध्य रात्रीच्या सुमारास अंबरखाना परिसरातील हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजा यांच्या दरम्यान असलेल्या एका अरुंद भागात मोठी गर्दी झाली. मोठ्या प्रमाणात ढकलाढकली झाल्याने काही जण खाली पडले. यावेळी परिस्थिती हाताबाहेर जाऊन चेंगराचेंगरी झाली. यात अनेकजण जखमी झाले.