छोट्या पडद्यावर रंग बरसे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छोट्या पडद्यावर धुळवडीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील मालिकांमध्ये आपापसातील हेवेदावे विसरून होळी साजरी होणार आहे.

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत छोट्या गोष्टीत आनंद शोधणाऱ्या कानेटकर कुटुंबात होळीच्या सणाला गोकुळ अवतरणार आहे. ‘आई कुठे काय करते?’ मालिकेत दरवर्षीप्रमाणे सण साजरा होणार आहे. इतकी वर्षे कुटुंबाच्या आनंदात आपला आनंद शोधणारी अरुंधती यंदा मात्र कोणत्याही बंधनात न अडकता आपल्या इच्छेनुसार सण साजरा करणार आहे.

यंदाची होळी ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील अंजी, पश्यासाठी खास ठरणार आहे. रंगांची उधळण करत हे दोघेही आपल्या प्रेमाची कबुली देणार आहेत. ‘मुरांबा’ मालिकेतही होळीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. ‘मुलगी झाली हो’, ‘स्वाभिमान’ आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतही होळीची धामधूम अनुभवायला मिळेल.