
‘स्टारबक्स’ने हिंदुस्थानी वंशाच्या आनंद वरदराजन यांची कार्यकारी उपाध्यक्ष तसेच चीफ टेक्निकल ऑफिसर पदावर नियुक्ती केली आहे. आनंद वरदराजन हे आता जगभरात विस्तारलेल्या ‘स्टारबक्स’चे नेतृत्व करणार आहेत. 19 जानेवारी रोजी ते नवीन पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
आनंद वरदराजन हे आयआयटी मद्रासचे माजी विद्यार्थी असून त्यांनी पडर्यू विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. तसेच त्यांनी वॉशिंग्टन विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेतली आहे. वरदराजन यांनी अॅमेझॉन कंपनीत 19 वर्षे काम केले आहे. त्यांनी अॅमेझॉनच्या वर्ल्डवाइड ग्रोसरी स्टोअरसंबंधित तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळीचे नेतृत्व केले आहे. अॅमेझॉनमध्ये काम करण्यापूर्वी वरदराजन यांनी ओरॅकल कंपनीत काम करत होते. स्टारबक्समधून डेब हॉल लेफ्वर हे सप्टेंबर महिन्यात निवृत्त झाले. त्यांच्या जागी वरदराजन यांची नियुक्ती झाली आहे.

























































