राज्यात 1 लाख 49 हजार रुग्णांवर उपचार, 11 हजार 813 नवीन रुग्ण

दिवसभरात राज्यात 9115 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण 3 लाख 90 हजार 958 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण 69.8 टक्क्यांवर पोहोचले आहे. आज 11 हजार 813 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या 1 लाख 49 हजार 798 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आज 413 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून राज्याचा मृत्यूदर 3.4 टक्के एवढा आहे.

मुंबईत आज 1,200 नवे रुग्ण, 48 जणांचा मृत्यू
मुंबईत आज कोरोनाचे 1,200 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 48 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 884 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱयाची संख्या आता 1 लाख 954 वर पोहोचली आहे. मुंबईत 48 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 6 हजार 988 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 87 दिवसांवर पोहोचला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या