एमबीए, एमसीए प्रवेशाच्या ‘सीईटी’ परीक्षांच्या तारखा जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ias-exams-bta1
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्य प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 9 व 10 मार्च, तर एमसीए प्रवेशासाठी 23 मार्च रोजी परीक्षा होणार आहे.

दोन्ही परीक्षांच्या अर्ज नोंदणीस सुरुवात झाली असून एमबीएसाठी 15, तर एमसीएसाठी 22 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येईल. एमबीएचे हॉलतिकीट 1 मार्च, तर एमसीएचे 8 मार्च रोजी विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल. अर्ज नोंदणीसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एक हजार रुपये, तर इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 800 रुपये शुल्क भरावे लागेल.  https://cetcell.mahacet.org या वेबसाइटकर विद्यार्थी अर्ज नोंदणी करु शकतात. तसेच परीक्षेच्या अधिक माहितीसाठी 022-22016157 या हेल्पलाइन क्रमांकावरही संपर्क साधू शकतात.

तारखा बदलण्याची शक्यता
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीईटी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो. यासंदर्भातील सूचना www.dtemaharashtra.gov.in या वेबसाइटकर जाहीर होईल, असे सीईटी सेलने स्पष्ट केले.

या आहेत सीईटीच्या संभाव्य तारखा

  • एलएलबी – 21 एप्रिल
  • बीई, बी. टेक्नॉलॉजी, बी. फार्मसी, बी. ऍग्रीकल्चर, मत्स्यशास्त्र, डेअरी टेक्नॉलॉजी – 2 ते 13 मे
  • बॅचलर ऑफ फाइन आर्ट – 20 मे, 19 मे (प्रात्यक्षिक)
  • मास्टर ऑफ ऍग्रीकल्चर – 18 मे
  • मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्नॉलॉजी – 18 मे
  • बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्नॉलॉजी – 20 मे
  • बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन – 21,22,23 मे (प्रात्यक्षिक)
  • मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन – 24,25,26 मे (प्रात्यक्षिक)
  • बी. ईडी, एम. ईडी – 22 मे