
राज्यात आज दिवसभरात एकूण 4 हजार 057 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्या घटली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणातदेखील वाढल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
राज्यात आज दिवसभरात एकूण 5 हजार 916 रुग्ण बरे होऊन परतले असून काल ही संख्या 2 हजार 506 इतकी होती. दरम्यान, आज राज्यात एपूण 67 जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर स्थिर असल्याचे दिसून आले आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत एकूण 62 लाख 94 हजार 767 रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण तब्बल 97.05 टक्के इतके आहे. राज्यातील एकूण एक्टिव रुग्णांची संख्या आता 50 हजार 095 वर आली आहे. सध्याच्या घडीला राज्यात सर्वाधिक ऍक्टिव रुग्ण पुण्यात आहेत. पुण्यात सध्या 12 हजार 325 रुग्ण आढळून आले असून पुणे पाठोपाठ ठाण्यात 7 हजार 273 तर साताऱयात 6 हजार 603 रुग्ण विविध रुग्णालयात दाखल आहेत.



























































