पेन्शनसह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱयांचे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह रिक्त पदे भरण्यासह इतर काही मागण्यांसाठी राज्यातील असंख्य सरकारी कर्मचाऱयांनी आज दुपारी आंदोलन पुकारले होते.

राज्याच्या विविध खात्यांतील सर्व रिक्त पदे कायमस्वरूपी त्वरित भरावीत आणि पंत्राटी पद्धतीने भरती करणे थांबवावे, अनुपंपा तत्त्वावर नोकरी मिळावी, वाढीव महागाई भत्ता लगेच मिळावा, कोरोनाशी प्राणपणाने लढणाऱया आरोग्य सेवेतील कर्मचाऱयांच्या घाऊक बदल्यांना स्थगिती द्यावी या मागण्यांसाठी आंदोलन पुकारले होते, अशी माहिती शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयाबाहेर आयोजित गेट मीटिंगमध्ये संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख व सरचिटणीस अविनाश दौंड यांनी दिली.

मंत्रालयासह राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांतील कर्मचाऱयांनी भोजनाच्या सुट्टीत आंदोलन पुकारले होते. राज्य सरकारने कर्मचाऱयांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन मागण्या त्वरित मान्य कराव्यात असा इशारा यावेळी देण्यात आला.