बुलेट ट्रेनला राज्य सरकारचा 9 कोटींचा निधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला राज्य सरकारने 9 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. बुलेट ट्रेनचा प्रकल्प महाराष्ट्रासाठी हिताचा नसल्याने महाविकास आघाडी सरकारने बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला विरोध दर्शवत भूसंपादनाची प्रक्रिया थांबवली होती; पण नव्या सरकारने या प्रकल्पाला मंजुरी देत आता या प्रकल्पाला निधीही उपलब्ध करून दिला आहे.

बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला काही फायदा होत नसल्याने महाविकास आघाडी सरकारने विरोध केला होता. बुलेट ट्रेनला महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, विरार व बोईसर अशी चारच स्थानके प्रस्तावित आहेत; तर वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती अशी आठ स्थानके गुजरातमध्ये आहेत. त्यामुळे बुलेट ट्रेनला महाराष्ट्रापेक्षा गुजरातलाच जास्त फायदा होत असल्याचा आक्षेप महाविकास आघाडी सरकारने घेतला होता.