
सामना ऑनलाईन । मुंबई
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा तीन दिवसांपासून सुरू असलेला संप अखेर आज मागे घेण्यात आला आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा थोड्याच वेळात करण्यात येणार आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये मार्ग काढण्यासाठी वित्तमंत्री तसेच मुख्य सचिवांसोबत बुधवारी झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने संप सुरूच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या मध्यवर्ती संघटनेने घेतला होता. मात्र २१ महिन्यांचा थकीत महागाई भत्ता सरकारने याच वर्षात दिल्यास संप मागे घेतला जाईल, अशी भूमिका संघटनेने घेतली होती. मात्र या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांकडून मुख्य सचिवांकडे व मुख्य सचिवांकडून मुख्यमंत्र्यांकडे अशी टोलवाटोलवीच सुरू राहिल्याने संप आज सकाळी देखील सुरूच ठेवण्यात आला होता.






















































