राजस्थानपाठोपाठ ‘या’ राज्यातही भाजपचा सत्तेचा सूर्य मावळणार, गुप्तचर विभागाचा अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-shah-tense

सामना ऑनलाईन । भोपाळ

राजस्थान पाठोपाठ मध्य प्रदेशमधुनही भाजपसाठी बॅड न्यूज आहे. शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला झटका बसू शकतो. राज्याच्या गुप्तचर खात्याने आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे. गुप्तचर खात्याने 30 ऑक्टोंबरला मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे आपला सीक्रेट अहवाल सोपवला.

मध्य प्रदेशात भाजपने 2 मंत्री- 27 आमदारांचे तिकीट कापले, महाराष्ट्राच्या आमदारांवरही टांगती तलवार

230 सदस्यांच्या मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेसला 128 जागा मिळतील असा अंदाज गुप्तचर खात्याने वर्तवला आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत सध्याच्या सत्ताधारी भाजपला 92 जागांवर समाधान मानावे लागेल असे या अहवालात म्हटले आहे. मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीला सहा तर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीला तीन जागा मिळतील असा अंदाज आहे. हे दोन्ही पक्ष सध्या काँग्रेससोबत आहेत. एका प्रमुख इंग्रजी वृत्तपत्राने या अहवालाचे वृत्त दिले आहे मध्य प्रदेशमध्ये मागच्या 15 वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. राज्यातल्या बुकींनी यावेळी सुद्धा भाजपच जिंकेल असा अंदाज वर्तवला आहे. पण गुप्तचर खात्याचा अहवाल काही वेगळेच सांगत आहे.

सर्व्हे काय सांगतोय… पंतप्रधान मोदीच, पण मुख्यमंत्री बदलणार

राजस्थानातही भाजपला बसणार झटका
टाइम्स नाऊ-सीएनएक्सच्या निवडणूकपूर्व सर्वेक्षण चाचणीचा अहवाल जाहीर झाला. त्यामध्ये राजस्थानमध्ये सत्ताधारी भाजपविरोधात जनतेमध्ये नाराजी असून तिथे सत्तापालट होण्याची शक्यता आहे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 200 सदस्यांच्या राजस्थान विधानसभेत काँग्रेसला 110 ते 120 जागा मिळण्याची शक्यता असून भाजपला 70 ते 80 जागा मिळू शकतात. एकूण 67 विधानसभा मतदारसंघात ही चाचणी करण्यात आली. काँग्रेसला 43.5 टक्के, भाजपला 40.37 टक्के आणि अन्य पक्षांना 13.55 टक्के मते मिळतील असा अंदाज आहे. राजस्थानात काँग्रेसबरोबर आघाडीस नकार देणाऱ्या बसपाला 2.88 टक्के मतांसह 1 ते 3 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2013 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 163 जागा जिंकून घवघवीत यश मिळवले होते.

14 टक्के आरक्षण, 40 जागांसह 11 मागण्या, ब्राम्हण समाजाच्या मागण्यांनी भाजप-काँग्रेस कोंडीत