
महाराष्ट्र राज्य काwशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्यावतीने दिनांक 12 डिसेंबर व 13 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाइन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक आणि कौशल्य विकास राज्यमंत्री शंभूराज देसाई हे याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातील किमान 60 ते 65 हजार रिक्त जागा बेरोजगार युवकांसाठी उपलब्ध होणार आहे. उमेदवारांनी रोजगार विभागाच्या महास्वयम या वेबसाईटला व महास्वयम हे अॅप डाऊनलोड करून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. मोझिला फायरफॉक्स पिंवा गुगल क्रोम या ब्राऊजरचा वापर करून या विभागाचे वेबपोर्टल http://rojgar.mahaswayam.gov.in ओपन करावे, जॉब सिकर म्हणून आपल्या युजरनेम व पासवर्डचा वापर करून लॉगीन करावे. स्क्रिनवर डाव्याबाजूस दिसणाऱया पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या टॅबमध्ये ऐच्छीक जिह्याची निवड करून प्रक्रिया पूर्ण करावी. व्हेकन्सी लिस्टींग या पर्यायावर क्लिक करून येणारा संदेश काळजीपूर्वक वाचावा व आय अॅग्री बटणावर क्लिक करावे, रोजगार मेळाव्यात पदांकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव, काwशल्य यानुसार प्राधान्यक्रम निश्चित करून इच्छुक पदांना अप्लाय करावे असे आवाहन करण्यात आले आहे.




























































