
महिला सबलीकरणाच्या दृष्टीकोनातून पुणे लोहमार्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण एलसीबी प्रभारीपदी राज्यात पहिल्यांदाच महिला पोलीस निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सुनीता रोकडे असे त्यांचे नाव आहे. पुणे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी त्यांना नियुक्त केले आहे. रोकडे 2006 सालच्या बॅचमधील असून त्यांनी यापुर्वी पुणे शहर, नवी मुंबई, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सांगली, पुणे ग्रामीण, मुंबई रेल्वे अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम केले आहे.
पुणे लोहमार्ग जिल्ह्यामध्ये एकूण सहा पोलसी ठाणे असून 168 रेल्वे स्टेशन आहेत. त्याशिवाय 235 प्लॅटफॉर्म, 13 दूरक्षेत्रे, सहा उप दूरक्षेत्र आणि चार मदत केंद्र आहेत. हद्दीतील कायदा व सुव्यव्यस्था राखण्यासाठी आणि महिला सबलीकरणाच्या हेतूने पहिल्यांदाच एलसीबी गुन्हे शाखेच्या प्रभारीपदी महिला पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे लोहमार्ग वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. दरम्यान, वरिष्ठ अधिकाNयांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे रोकडे यांनी सांगितले.



























































