अपत्यहीन जोडप्यांसाठी आशेचा किरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. प्रदीप महाजन, (रिजनरेटिव्ह मेडिसिन एक्स्पर्ट, मुंबई)

योग्यरीत्या नियोजन करूनही मूल न होणे ही एक धोक्याची घंटा असू शकते. मूल न होण्याशी संबंधित सामाजिक कलंक आजच्या काळातही तितकाच जास्त आहे. ‘वंध्यत्व’ ही संज्ञा अशी गोष्ट आहे जी कोणत्याही जोडप्याला किंवा कुटुंबाला एक मोठा धक्का देते. कारण ती ‘अक्षमता’ दर्शवत असल्याचे मानले जाते. हिंदुस्थानातील 10 ते 15 टक्के जोडप्यांना प्रजननासंबंधी समस्या असल्याचे ज्ञात आहे आणि हा केवळ एक ढोबळ अंदाज आहे; कारण सर्व जण अशा समस्यांची तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत किंवा त्याविषयी खुलेपणाने बोलत नाहीत.

वंध्यत्वाची कारणे

वंध्यत्वाची कारणे वेगवेगळी आहेत. पूर्वी स्त्रीचे वाढते वय हे गर्भधारणा न होण्याचे प्रमुख कारण मानले जात असे. तसेच क्षयरोग, टय़ूमर, पुनरुत्पादक अवयवांसंबंधी समस्या, संप्रेरकांचे असंतुलन, जीवनशैलीच्या सवयी आदी यांसारख्या विविध कारणांमुळे स्त्री आणि पुरुष दोघांनाही वंध्यत्व येते.

वंध्यत्वाच्या उपचारात प्रगती

वर्षानुवर्षे वंध्यत्वाच्या उपचारात लक्षणीय प्रगती झाली असली तरी, बऱयाचदा वंध्यत्वास कारणीभूत परिस्थितीवर केवळ सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रांनी मात करता येत नाही. वैद्यकीय शास्त्रातील दिवसेंदिवस होणारी प्रगती पाहता आता आपल्याला आपल्या शरीरातील संसाधनांचा वापर करून वंध्यत्वावर मात करता येते. सेल-आधारित थेरपी ही अशीच एक उदयोन्मुख पद्धत आहे जी पुरुष आणि महिला वंध्यत्वासह अनेक परिस्थितींच्या उपचारांमध्ये आशेचा किरण निर्माण करते.

सेल-आधारित थेरपी आणि वंध्यत्व

सेल-आधारित थेरपीमागील तत्त्व हे आहे की, आपल्या शरीरात स्टेम पेशी आणि वाढीचे घटक असतात, जे सूज आणि डाग कमी करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास, इतर पेशींचे कार्य वाढविण्यासाठी, नवीन पेशी तयार करण्यासाठी मदत करतात. अशा प्रकारे, प्रजनन तसेच इतर प्रणालीगत समस्या, सेल-आधारित थेरपीद्वारे संबोधित केले जाऊ शकतात.

आता हे ज्ञात आहे की अंडाशयात स्टेम पेशी आहेत, ज्याचा वापर अंडी वाढविण्यासाठी केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे, पुरुषांच्या अंडकोषांमध्ये स्टेम पेशी असतात ज्या शुक्राणू तयार करू शकतात, ज्याचा उपयोग ऑलिगोस्पर्मिया/अझोस्पर्मियासारख्या समस्या सोडवण्यासाठी केला जाऊ शकतो. शिवाय, विशिष्ट प्रकारचे स्टेम पेशी फॉलिकल उत्तेजक हार्मोन रिसेप्टर व्यक्त करतात, जे विशिष्ट पुनरुत्पादक प्रक्रियांचे नियमन करणारे हार्मोन आहे. स्टेम पेशी एंडोमेट्रिओसिससारख्या परिस्थितीत फायदेशीर ठरू शकतात आणि एंडोमेट्रियल जाडी वाढविण्यात मदत करू शकतात.

एकंदरीत, वंध्यत्वाच्या विविध कारणांवर एकटय़ा सेल-आधारित थेरपीने किंवा सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रांच्या संयोगाने त्यांचे परिणाम वाढवता येतात. वंध्यत्वाच्या प्रत्येक प्रकरणाचे कारण शोधणे आणि वैयक्तिक उपचारांची योजना करणे आवश्यक आहे, ज्यामुळे जोडप्यांना त्यांचे पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करता येईल.