
बऱ्याचदा घर स्वच्छ करताना दरवाजाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे सर्वात आधी दरवाजावरील धूळ काढण्यासाठी मऊ, कोरड्या कापडाचा वापर करा. दरवाजा पुसण्यासाठी गरम पाण्यात थोडे डिश साबण मिसळा. या मिश्रणात कापड बुडवून, ते पिळून घ्या जेणेकरून ते फक्त ओलसर राहील. त्याला जास्त ओले करू नका.
जाड डाग किंवा खुणांसाठी, फर्निचर पॉलिशचा पातळ थर लावा आणि गोलाकार हालचालीत घासून घ्या. दरवाजा पूर्णपणे कोरडा करण्यासाठी दुसऱया स्वच्छ, कोरडय़ा कापडाचा वापर करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाकडी दरवाजे स्वच्छ करण्यासाठी कधीही कठोर रसायने किंवा अपघर्षक उत्पादने वापरू नका.


























































