
पत्नी गेल्यावर दुसरे लग्न करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. त्याची दुसरी पत्नी लेस्बियन होती आणि ती मुलींना औषध खाऊ घालून त्यांच्यावर बलात्कार करायची. या प्रकरणी पोलिसांनी अरोपी महिलेला अटक केली आहे.
उत्तर प्रदेशच्या अलीगढ जिल्ह्यात एका व्यक्तीच्या पत्नीचे 2019 मध्ये निधन झाले होते. नंतर या व्यक्तीचे फेसबुकवर एका महिलेशी ओळख झाली. आपण नर्स असून एका खासगी रुग्णालयात काम करत असल्याचे या महिलेने सांगितले. दोघांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. नंतर दोघांनी मंदिरात रीतसर लग्नही केले. ही महिला कुटुंबीयांना जेवल्यानंतर एक गोळी द्यायची. ही गोळी आरोग्यासाठी चांगली असते असे तिने सांगितले. य व्यक्तीला दोन मुली आणि एक मुलगा होता. दोन पैकी एक मुलगी अल्पवयीन होती. महिला या मुलींना शारिरीक संबंध निर्माण करण्यासाठी उत्तेजक गोळ्या द्यायची. त्यांना पॉर्न फिल्मही दाखवायची. असे करून तिने आपल्या दोन्ही सावत्र मुलींवर बलात्कार केला.
मोठ्या मुलीने जेव्हा याविरोधात जेव्हा आवाज उठवला तेव्हा महिलेने पीडित मुलीला धमकी दिली. अखेर मुलीने आपल्या वडिलांना सर्व हकीगत सांगितली. तेव्हा पीडीत मुली आणि वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.




























































